नाशिक: पाणी ही लोकचळवळ करा, श्रमदानं ही मोठी शक्ती पणास लावा, पाणीदार गाव, पाणीदार गड, पाणीदार जुने भग्न जलाशये बोलके होतील, इच्छा व अखंडित राबन्याची जिद्द हवी गेल्या २५ वर्षे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या अथक श्रमाने, आम्ही जलसंवर्धन विषयावर अधिक अखंडित श्रमदानं केलं, त्यात आम्हाला शास्वत समाधान मिळाले, ते ही स्वावलंबी श्रमदानाने कुठला चॅरिटी नाही, कुठली वर्गणी नाही, स्वखर्चाने, केवळ श्रमदानाने हे काम अविरत सुरु ठेवले आहे.
गडकिल्ले संवर्धन कार्यात सह्याद्रीतील नदयांची उगमस्थांने, गडकिल्ल्यानवरील कितीक वर्ष पूर्ण बुजलेली अस्तित्व हीन झालेल्या जल टाक्या, कुंड यांना शोधून त्यांची अभ्यासात्मक गाळ काढणी, आम्ही दुर्गसेवकांनी त्या जलाशयांचा शोध घेतला पाझर फुटे पर्यंत श्रमदानं केलं, नद्या, नाले, जुन्या विहिरी, कुंड बारवा, जुने शिवकालीन तळे हे श्रमाने पाणीदार करा, होतं फक्त जिद्द स्वतःच्या मेहनतीवर विश्वास हवा
रामशेज पाणीदार झाला कसा?
अनेक गडावर श्रमदान ते ही अभ्यासू पणाने केलं, आधी शिकलो अनुभवाने काम केलं, एकूणच श्रमदानाचा प्रवास २००० साला पासूनअ विरत, त्यात विविध काम केली,महत्वाचे जलसंवर्धनाचं कर्म केलं,
रामशेजच्या १७ जुन्या टाक्यासह, रांजनगिरी, भास्करगड, कन्हेर, आडगड, पेमगिरी, अहिवंत,कन्हेर,देहेरगड, कावनई,मार्कंडेय, राजधेर,इंद्राई,अंकाई टंकाई, अचलागड,हातगड,सोनगड, कांचनगड,पाबरगड,हरिहर,साल्हेर, मुल्हेर, दूंधेश्वर,अश्या कितीक गडावर पान्याच्या जुन्या जलाशयाचा शोध घेऊन गाळात बुजलेल्या जलटाक्यातील गाळ काढणी केली, नंतर अनेक दुर्गसेवक त्या राहिलेल्या कामासाठी राबले, नाशिक जिल्ह्यातील होळकर कालीन ११ गाळात, दगडात रूतलेल्या बारवा गाळमूक्त व्हाव्या, पात्रातील दगड काढली बाजूला रचली, असे श्रमदानं कायमच केले, त्यात गिरणारे,आडगावं २ बारवा, धोडप, ब्रम्हगिरी,सिन्नर,सोनगाव, जव्हार घाटात अंबई बारव,अश्या बारवाचे श्रमदानाने त्यांची दशा दूर केली त्या अस्तित्व हरवून बसलेल्या बारवा आज सर्व पाणी दार आहेत,
उन्हाळ्यात कडाक्याची उष्णता, वन्यजीव, पक्ष्यांसाठी अनेक नैसर्गिक पानवठे आम्ही दरवर्षी करत असतो, जव्हार, हरसूल,घाटात दरिमाता परिसर व घाटात आटलेली नैसर्गिक झिरे पुन्हा पाणी दार बोलती केली, त्यांचा गाळ काढून झिरपणारे थेंब थेंब पाणी एकत्रित त्या झिऱ्यात पाणी साचायला लागले, उर्वरित पाणी जमिनीत जिरायला व अधिक आणी बाजूने वाहून जायला लागले, पाणी हे जीवन आहे, हे केवळ बोलून सांगून होईल का? हो त्यासोबत श्रमदान व ध्येयासक्ती असेल, अन श्रमाच वेड असेल तर पाण्याचे जुने ऐतिहासिक जलस्रोत टिकतील व पाणीदार होतील.
स्वावलंबी दुर्गसेवक व वारकरी असल्याचे समाधान हेच संतांनी संगितलं तो हाच मार्ग.. राज्यांचे गडकोट पाणीदार व्हावे, दुर्ग हीच शिवप्रभुंची खरी मंदिर आहेत, हे समजून घ्या, थोडं राज्यांच अज्ञापत्र वाचा, बारवा, कुंड, शिवकालीन तळे, जुन्या विहिरी पाणीदार करा. त्यांची भग्न अवस्था दूर करा, तो आपला ऐतिहाशिक ठेवा वारसा आहे. त्यासाठीच अखंडित श्रमदानं त्यातून शास्वत कर्म घडावं हीचं शास्वत भक्ती व सेवा आम्ही करतोय तूम्ही ही करा असे आवहन राम खुर्दळ, संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हा यांनी केले सर्व शिवभक्तांना केले आहे.
