सावधान: भामट्यांनी रचला डाव; सिडकोतील अश्विननगर परिसरात महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव दुचाकीची धडक देत भामट्यानी जखमी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली असून, या घटनेत महिलेच्या डाव्या पायाचे
हाड मोडले आहे.
याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करून जबरीचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा चंद्रकांत चौधरी (वय ५५, रा. शांताई बंगला, अश्विननगर, सिडको) यांनी फिर्याद दिली
आहे. चौधरी सोमवारी (दि. ३) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. स्वामी विवेकानंद जलतरण तलावासमोरील रस्त्याने त्या पायी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत पाय मोडल्याने त्या रस्त्यावर पडल्या असता, डबलसीट असलेल्या भामट्यांनी त्यांना मदतीचा हात न देता, त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख ६५ हजार रुपये किमतीचे मंगळवूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी उपनिरीक्षक घुनावत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!