पुढली हप्त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘आभार दौरा यात्रा’ नाशकात

नाशिक मनपाच्या ३१ प्रभागांमध्ये नियोजन दौऱ्याची झाली सुरवात

विजय पाटील,

नाशिक (प्रतिनीधी) : विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला भरघोस यश मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आभार दौरा यात्रा’ सुरू केली आहे. गुरुवारी (दि. १३) एकनाथ शिंदे यांची ही यात्रा नाशिक जिल्ह्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पूर्व तयारी व नियोजनासाठी शिवसेना नाशिक महानगरच्या वतीने मनपाच्या सहा विभागांमधील ३१ प्रभागांमध्ये नियोजन दौऱ्याची सुरवात करण्यात आली.

त्याअनुषंगाने गुरुवारी (दि. ६) मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ७, १२, १३, १४, १५ व १६ मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी संपर्क प्रमुख संगीता खोडांना, जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले, महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, शशिकांत कोठुळे, महेश जोशी, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, योगेश चव्हाणके, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया, रोशन शिंदे, जॉय कांबळे, सचिन भोसले, मेघा नितीन साळवे, सुषमा रवी पगारे, सहकार सेलचे विशाल साळवे, रवींद्र देवरे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, सुधाकर जाधव, उमेश चव्हाण, सुनील भामरे, संदीप डहाणके, नितीन साळवे, युवासेना चिटणीस आदित्य बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख विशाल खैरनार, निखील कापडणे, अमोल जोशी, शिवा जोशी, तुषार गिरी, शुभम घुले, समीर देवघरे, वैभव पळसकर, गौरव पगारे, विवेक जवंजाळे आदी सर्व प्रभागातील पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!