दिंडोरी-पेठ 78.01 टक्के मतदान: तेरा उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंदीस्त!

कृष्णा पैठणे,

वणी (प्रतिनिधी): दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघासाठी वणी शहरातुन १२ मतदान केंद्रावर एकुण १२८५२ पैकी ८५१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त केले.
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विरुद्ध महा आघाडीच्या उमेदवार माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांच्यात समोरासमोर लढत आहे. याच मतदार संघाचा केंद्रबींदू असलेल्या वणी शहरात बारा मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सर्वच मतदान केंद्रावर उत्साह दिसुन आला. दुपार नंतर मतदारांची गर्दी कमी झालेली दिसत होती. दरम्याण अगदी ९५ वर्षाच्या वृध्दाने मतदानाचा हक्क बजावला तसेच नविन मतदार यांनी पहिला मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह दिसुन येत होता. वणी शहरातुन १२ मतदान केंद्रावर एकुण १२८५२ पैकी ८५१५ म्हणजेच शेकडा ६६.२५% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त केले. वणी परिसरात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असुन वणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होती. सर्वत्र खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!