वणी (प्रतिनिधी): कांद्याच्या बाजारभावात होत असलेली घसरण बघता केंद्राने तात्काळ आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे आवाहन एका लेखी निवेदना द्वारे दिंंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी एका निवेदना द्वारे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना केले आहे.
चालु वर्षात नाशिक जिल्हासह राज्यात कांद्याचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन झाल्याने बाजारात आवक वाढली असुन त्यामुळे भावात घसरण सुरु असल्याचे चित्र आहे. तसेच पाकिस्तान, दुबई यासारख्या देशांमध्ये भारतातील बाजारमुल्यापेक्षा कमी किमतीत निर्यात होत आहे, यामुळे ह्या देशांमध्ये भारतीय कांद्याची मागणी घटलेली आहे.
गेल्या १२ तारखेला दिंडोरी कृ.उ.बा. आवारात नव्या लाल कांद्यास सरासरी ३७०१ रुपये प्रति क्विंटल होता; परंतु अवघ्या दोन दिवसात हा भाव घसरुन सरासरी २६५१ प्रति क्विंटल इतका झाला. कांद्याची वाढती आवक बघता भविष्यातही हे भाव घसरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याची आर्थिकदृष्ट्या विवंचणा होण्याची दाट शक्यता आहे. सदर शेतकऱ्याचे संभाव्य नुकसाण टाळण्यासाठी कांद्यावर लावले जाणारे २०% निर्यात शुल्क कमी करावे अथवा पुर्णत: काढुन टाकले तर आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याचे स्पर्धात्मक मुल्य वाढुन स्थिरता वाढेल. तरी या प्रकरणी सकारात्मक पावले उचलावी असे आवाहन एका लेखी निवेदनावरुन करण्यात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण यांना दिंडोरी कृषी उत्पण्ण बाजारसमितीचे सभापती प्रशांत कड व सचिव जे के जाधव यांनी केले आहे.