पत्रकार दिनी त्यांनी केली जेष्ठ पत्रकार गायकवाड यांच्या स्मारकाची स्वच्छता!

नाशिक (प्रतिनिधी): पत्रकार दिनानिमित्त तुषार सोळुंके व सीमाताई सोळुंके यांच्या कार्यालयात नाशिकच्या पत्रकारांचे सत्कार करण्यात आले तर नाशिक येथिल थोर समाज सुधारक व चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग (आण्णा) गायकवाड यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांच स्मारकाचे व आजूबाजूच्या परिसराचे साफसफाई करत स्वच्छता मोहीम राबवून पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने पुतळा व परिसर स्वच्छ केला.

यानंतर तुषार सोळुंके व त्यांच्या मित्रपरिवारांनी गायकवाड अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान केला. प्रसंगी सीमा सोळुंके तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण थोरात, सीताराम सोळुंके, मिलिंद थोरात, समाधान पगारे, दत्तात्रय थोरात, दगडू जगताप, देविदास शिंदे, संजय पाटील, कारभारी काळे, प्रवीण कांबळे, विजय कदम आदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!