नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १८ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख या पदावर समपुदेशन पद्धतीने पदोन्नती देण्यात आली आहे. मार्च महिन्यात विभागाने ९५ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक-प्राथमिकव मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख पदोन्नती दिली होती. यात पुन्हा पदोन्नतीस विलंब होऊ नये, यासाठी विभागाने जूनअखेर रिक्त असलेल्या २२ जागांसाठी पदोन्नती प्रक्रिया राबविली आहे.
जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पदांपैकी ९३ पदे रिक्त होती. ती भरण्याची नऊ वर्षांपासून शिक्षकांची मागणी होती. गेल्या वर्षी आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर, प्राथमिक विभागाने ही प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. परंतु, पदोन्नती प्रक्रियेतील निकषाबाबत शिक्षक संघटनांनीच आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया रेंगाळली होती. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध झाल्याने या निर्णयाविरोधात शिक्षक न्यायालयात गेले होते. खंडपीठाने त्या याचिकेची गंभीर दखल घेत विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने निर्धारित यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर दि. ५ मार्चला समपुदेशन पद्धतीने प्रक्रिया राबवित एकूण ९५ पदे पदोन्नतीने भरण्यात आली होती. ही प्रक्रिया राबविल्यावर विभागाने रिक्त झालेल्या जागांसाठी पदोन्नती प्रक्रिया राबविली. यात प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना पाचारणा करून यातील १८ शिक्षित पदवीधर शिक्षक- प्राथमिकव मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी- दि. २५ जुन्या सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबविली गेली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिक भास्कर कनोज, अनिल दराडे, सलीम पटेल, सुनील सोनवणे उपस्थित होते.
