अपघातात दाेघांचा जिव गेल्यावर अतिक्रमण विभागास आली जाग!

  • पाथर्डी फाट्यावर १५५ हातगाड्या, टपऱ्या हटवल्या
  • त्रिमूर्ती चाैकातही ३० अतिक्रमणांवर कारवाई 

संध्या पाटील,

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथे रस्त्यालगत‎अनधिकृत टपरीधारक व खाद्य‎विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत भर‎पडत असल्याने १० दिवसांपूर्वीच येथे‎ अपघाताच्या २ घटनांमध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागले. अखेर पालिकेच्या अतिक्रमण‎ निर्मूलन विभागाने मंगळवारी (दि.‎७) ११५ हातगाड्या, टपऱ्या हटवत ‎तब्बल ट्रक भरून साहित्य जप्त केले.‎
पाथर्डी फाटा पंपासमाेर हॉटेलच्या भिंतीलगत‎अनधिकृत टपरीधारक, खाद्यविक्रेते यांची अतिक्रमणे‎ काढताना गाेंधळ निर्माण झाला हाेता. मात्र, ‎अतिक्रमणधारकांना गुन्हा दाखल करण्याचा इशारा ‎दिल्यावर विनाअडथळा अतिक्रमण काढण्यात आले.


त्रिमूर्ती चाैकातही ३० अतिक्रमणांवर कारवाई करत येथे गाळेधारकांनी ‎दुकानापुढे अनधिकृतपणे शेड टाकले हाेते. काही जणांचा‎ स्वत:चा व्यवसाय तर काही जणांनी भाड्याने जागा दिली ‎हाेती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. येथेही ३०‎अतिक्रमणे हटविण्यात आली.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!