घोटीत शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तानाजी रुमणेंच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

घोटी (प्रतिनिधी): शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, इगतपुरी शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवसेना उपनेते उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय करंजकर. जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे समन्वयक सदानंद नवले, संपर्क प्रमुख कुंडलिक जमदडे, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे, मोहन बहे, तालुका प्रमुख देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय गुंजाळ, घोटी शहर प्रमुख तानाजी रुमने यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणे-

घोटी शहर संघटकपदी धोंडीराम चैतु भागडे, सहसंघटकपदी दीपक भिमा नवले, घोटी शाखा प्रमुखपदी राजु बबन भोर, घोटी उपशहर प्रमुखपदी भाऊसाहेब निवृत्ती कडु, घोटी शहर समन्वयकपदी आदित्य सुरेश कुंदकुरीवार, महिला आघाडी घोटी शहर संघटकपदी मीनाक्षी किरण कडवे, घोटी शहर उपप्रमुखपदी वैभव भगवान कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना निवडीचे पत्र विधानसभा प्रमुख दत्तात्रय गुंजाळ व घोटी शहर प्रमुख तानाजी रुमणे यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षवृध्दीसाठी आपला सर्वांचा मोठा हातभार लावणे आवश्यक असून यात 80% समाजकारण व 20% राजकारण हे लक्षातच ठेऊन आपले कार्य करत घोटी शहरात पक्षास आपल्या नियुक्तीची मोठी ताकद मिळून द्यावी असे सांगत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना तानाजी रूमणे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख विनोद भागडे, तालुका समन्वय पंडित कातोरे, इगतपुरी शहर प्रमुख भूषण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!