नाशिक (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र पंचवटीतील श्री काळाराम मंदिरामध्ये शुक्रवार (दि.१०) ते शुक्रवार (दि.१७) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची अशी माहिती अखंड हरिनाम सप्ताह संयोजक प्रमुख हभप दामोदर महाराज गावले यांनी दिली.
श्रीक्षेत्र नाशिक पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, नित्य आरती होणार आहे. तसेच सकाळच्याच सत्रात रोज सकाळी ८ ते ९ यावेळेत प्रवचन होणार असून यात अनुक्रमे हभप. रघुनाथ महाराज खेडलेकर (खेडलेझूंगे),आनंदा महाराज महाले (गणेश गावकर), रामनाथ महाराज सोनवणे (नाशिक), भास्कर महाराज टेकाडे (नाशिक), सुरेश महाराज मगर (नाशिक), पुरूषोत्तम महाराज घुमरे (जानोरी), जयंत महाराज गोसावी (संत निवृत्तीनाथ महाराज पुजारी) प्रवचन देणार आहे. तर सांयकाळाच्या सत्रात ६ ते ८ या वेळेत रोज अनुक्रमे हभप. ऋृषिकेश महाराज चव्हाण (येवला), महादेव महाराज राऊत (बीड), दामोदर महाराज गावले (नाशिक), कृष्णा महाराज चवरे (पंढरपूर), माधव महाराज घुले (मठाधिपती-इगतपुरी), शंकर महाराज बडवे (पंढरपूर), श्री. प. पू. हरिचैतन्य सरस्वतीजी महाराज (बुलढाणा) यांचा हरिकीर्तनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली-आळंदी) यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे.
