प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): नाशिक मुंबई महामार्गावरील राजुर बहुला शिवारातील निर्मल आश्रमाच्या जवळून टिटवाळा येथुन अंबासन ता.सटाणा येथे जात असलेल्या पती व पत्नीवर जबरदस्तीने मारहाण करून स्कुटीची चावी हिसकावत १० हजार रुपयांचा मोबाईल हिसकवल्याची घटना वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असुन वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित आरोपी हरिओम अरविंद सिंग, (वय: 22) वर्ष, ऋषिकेश अशोक राजगिरे (वय:24) वर्ष दोन्ही रा. घरकुल योजना चुंचाळे शिवार, अंबड या ठिकाणाहून आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमालासह फिर्यादीचा मोबाईल व वापरलेले वाहनसह ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, एक्टिवा स्कुटी वरून टिटवाळा मुंबई येथून नाशिक हायवेने अंबासन कडे जात असताना रात्री 08:00 वाजेच्या सुमारास मुंबई नाशिक हायवे वरील राजूर बहुला शिवारातील निर्मल आश्रम च्यापुढे फिर्यादीचे पती लघुशंकेसाठी थांबले असताना रस्त्याने समोरुन रॉंग साईडने मोटरसायकल वरून त्यांच्या मोटरसायकल जवळ दोन इसम हे फिर्यादी व फिर्यादीचे पती यांचे जवळ येऊन फिर्यादीचे स्कुटीची चावी काढली व फिर्यादीचे पतीस गच्ची धरून धक्काबुक्की करत मारहाण शिवगाळ केली तेव्हा फिर्यादीने आरडा ओरड केली असता लोकांची गर्दी जमा होत असल्याचे बघून यातील आरोपीत मजकूर पैकी एका आरोपीत मजकुर याने फिर्यादीस धक्का देऊन व दुसऱ्या आरोपीत मजकूर याने फिर्यादीच्या हातातील रुपये 10000/- किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकाऊन चोरी करून नेला अशी फिर्यादी यांनी वाडीवर्हे पोलीस ठाणे दिलेल्या फिर्याद वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, व अप्पर पोलीस अधीक्षक मा. आदित्य मिलखेलकर सर यांचे मार्गदर्शन खाली Dysp हरीश खेडकर यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक हेमांतकुमार भामरे व त्यांचे तपास पथक मधील अधिकारी पीएसआय बिऱ्हाडे व अंमलदार पो.हवा प्रविण काकड, धारणकर, पो.शि.सोनवणे, गांगुर्डे, पोना विशाल बोराडे,लहामटे हे करत असताना वाडीवर्हे पोलीस ठाणे कडील नमुद अधिकारी व अंमलदार पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
