नाशिक (प्रतिनिधी): खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एकाने महिलेकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तालय परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब दत्तात्रेय भोर (वय ५०, रा. राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत महात्मानगर भागात राहणाºया एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २०१७ पासून संशयित महिलेस त्रास देत असून, त्याने वेगवेगळ्या कार्यालयांत महिलेविरोधात खोट्या तक्रारी दिल्या आहेत. शुक्रवारी (दि. ७) महिला जबाब नोंदविण्यासाठी पोलिस आयुक्तालय भागात आली असताना ही घटना घडली. संशयिताने आयुक्तालयापासून काही अंतरावर महिलेची वाट अडवून बलात्कार करण्याची धमकी दिली. यावेळी त्याने पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत दहा वर्षे शिक्षा असलेल्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.
Related Posts
अवैध गर्भपात करणा-या डॉक्टरच्या हॉस्पिटलवर छापा!
अंकुश निकम, नाशिक (प्रतिनिधी): महात्मा नगर येथील पंड्या हॉस्पिटल मध्ये नाशिक म. न. पा. आरोग्य विभाग व अन्न औषधं प्रशासन…
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवत व्यावसायिकास एक कोटीचा घातला गंडा!
नाशिक (प्रतिनिधी): संशयिताने व्यावसायिकाचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली असून,…
न्यायाधीशांच्याच बंगल्याच्या आवारात पुष्पा आला व चंदनाचे झाड कापून गेला
नाशिक (प्रतिनीधी) : बंगल्याच्या आवारातून तस्करांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार चेतनानगर भागात घडला. न्यायाधीशांच्याच बंगल्याच्या आवारात अज्ञात पुष्पा आला…
