तडीपार केलेले असताना ही शहरात वावरत होता पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

नाशिक (प्रतिनिधी): हद्दपारीची कारवाई केलेली असताना शहरात वावरणा-या तडीपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई सिडकोतील बडदेनगर ते पाटील नगर दरम्यानच्या खोडेमळा भागात केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ अलिम सय्यद (वय २५, रा. पाटीलनगर, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडीपाराचे नाव आहे. अल्ताफ सय्यद याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याच्याविरूध्द शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिल्ह्यातून त्यास दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना त्याचा वावर शहरातच होता. पोलिस त्याच्या मागावर असताना शुक्रवारी (दि.७) सायंकाळी तो युनिट २ पथकाच्या जाळ्यात अडकला. सिडकोतील बडदेनगर ते पाटीलनगर दरम्यानच्या खोडेमळा येथील सुरज हॉटेल समोर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अंमलदार किरण अहिरराव यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. ही कारवाई युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुहास क्षीरसागर, हवालदार प्रकाश बोडके, किरण अहिरराव व वाल्मिक चव्हाण आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!