नाशिक (प्रतिनीधी) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ७) रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीजवळ सायंकाळी ६ वाजता गोदावरी नदीची महाआरती करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री महेश शर्मा यांना राष्ट्र जीवन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे श्री गौतमी गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गोदावरी नदीची महाआरती आणि राष्ट्र जीवन पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ओझर विमानतळ येथे राज्यपालांचे आगमन होईल. तेथून सहा वाजता ते रामकुंड येथे कार्यक्रमस्थळी पोहोचतील. कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर सायंकाळी सात वाजता ओझर विमानतळाकडे ते प्रयाण करतील. राज्यपालांच्या दौºयाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे, तसेच पोलिस विभागाकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
