गुंडा विरोधी पथकाने कमरेस पिस्तूल लाऊन फिरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या!

नाशिक (प्रतिनीधी): बेकायदा पिस्तूल बाळगणाºया तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ही कारवाई देवळाली गावातील सुंदरनगर भागात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे (वय २१, रा. सुंदरनगर, देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सुंदरनगर भागात एका तरुणाच्या कमरेस पिस्तूल लावलेली असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.१) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची चाहूल लागताच त्याने रोकडोबावाडीच्या दिशेने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्यास बेड्या ठोकल्या. संशयिताच्या अंगझडतीत गावठी कट्यासह दोन जीवंत काडतुसे मिळून आले असून संशयितास मुद्देमालासह उपनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मनाई व शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक दिलीप सगळे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, सुनिता कवडे आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!