पीक विम्याची रक्कम मिळवुन द्यावी यासाठी काॅंग्रेसचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला होता यावेळी भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन शेतकरी हवालदील झाला होता परंतु पीक विमा भरलेला असल्याने एक आशेचा किरण शेतकर्यांसमोर होता याप्रसंगी विमा कंपनीचे अधिकारी प्रत्यक्षात बांधावर जावुन खात्री करून गेले मात्र अजुन एक छदामही शेतकर्यांना मिळाला नाही.

यामुळे कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे नायब तहसीलदार श्री गेंडाळे यांना निवेदन देण्यात आले इतर तालुक्यात हि रक्कम वितरीत झाली असुन इगतपुरीवर अन्याय का? म्हणून लवकरात लवकर विमा रक्कम मिळवुन न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला याठीकाणी कॉग्रेसचे मा तालुकाध्यक्ष रामदास पा धांडे,जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाड़े,जेष्ठ नेते निवृत्ती पा कातोरे,जेष्ठ नेते दशरथ पा मालूंजकर,ता उपाध्यक्ष बाळासाहेब लंगड़े, युवक कॉग्रेसचे योगेश सुरूडे,चंदू शेठ किर्वे, सुदाम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!