नाशिक (प्रतिनिधी): योगेश ज्ञानेश्वर जाधव, तलाठी, ठेंगोडा, ता. सटाणा, जि. नाशिक व संजय गंगाधर साळी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, सटाणा, जि. नाशिक यांनी १५०००/- रुपयांच्या लाच मागणी व स्विकारण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदार यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेतीस त्याचे शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्याचे नाव लावण्याचे मोबदल्यात २५०००/- रुपयांची मागणी केली होती या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी मंडळ अधिकारी साळी यांचे सांगण्यावरून तलाठी जाधव यांनी पंचायत समक्ष तक्रारदार यांच्याकडे १५०००/- रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून सटाणा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (ए) १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
