पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग; दोघांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत

शस्त्र खरेदी करणा-यांचा घेणार शोध
लासलगाव पोलिसांनी गावठी कट्ट्यांसह अटक केलेले संशयित शहरात कोणाला शस्त्र विकणार होते, तसेच त्यांनी यापूर्वी शहरात आणखी कोणाला शस्त्रांची विक्री केली आहे का? याविषयी लासलगाव पोलीस कसून चौकशी करीत आहेत. अशा प्रकारे संशयितांकडून शहरात कट्टे विक्रीच्या उद्देशाने आल्याचे आढळून आल्याने पोलिसांसमोर आला या शस्त्रांची खरेदी करणाºयांना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नाशिक : गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील २ तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतूसे आणि मोटार सायकल, असा एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली. लासलगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने संशयितांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत विंचूर तीन पाटी भागात कारवाई करीत दोन २२ वर्षीय तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालायने संशियतांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटार सायकलने पहाटे अडीच ते पावणे तीन वाजेच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले. यावेळी संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस शिपाई सुजय बारगळ व चंदू मांजरे यांनी तत्काळ दोघा संशयितांचा पाठलाग करीत त्यांना विंचूर त्रिफुली येथे गाठून पोलीस शिपाई विजय पैठणकर, संदीप निचळ, संदीप डगळे, अविनाश सांगळे यांच्या मदतीने पकडले. या कारवाईत संशयित अनिकेत कैलास मळेकर (वय २२, रा. धायरी, पुणे) आणि नामदेव रामभाऊ ठेबे (वय २२) या दोघांना पथकाने ताब्यात संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे आणि नऊ जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी पोलीस शिपाई सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयित अनिकेत मळेकर व नामदेव ठेबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!