नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शुक्रवारी (दि. 13) सार्वजनिक व खासगी (घरगुती) गणरायाचे विसर्जन केले जाते. यानिमित्ताने छोटेखानी पद्धतीने शहरात विसर्जन मिरवणुका काढल्या जातात. यानिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता शुक्रवारी पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ या भागात गर्दी उसळून वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या सिटी लिंक बसेससह पंचवटी आगारातून सुटणाऱ्या महामंडळाच्या बसेस, जड मोटार वाहनांना दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत वरील मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे. सीबीएस- कडून पंचवटीकडे जाणाऱ्या सर्व बसेस व अन्य जड वाहने अशोक स्तंभापासून पुढे रविवारकारंजा व पंचवटी कारंजाकडे जाणार नाहीत.
या मार्गावरील वाहतूक बंद –
- अण्णा भाऊ साठे पुतळा चौफुलीकडून कालिदास कलामंदिराकडे जाणारा रस्ता (दुतर्फा)
- सीबीएस ते कान्हेरेवाडीमार्गे बी.डी. भालेकर मैदानासमोर येणारा रस्ता
- सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल आणि शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा रस्ता.
- खडकाळी सिग्नलकडून शालिमार कॉर्नरपर्यंतचा रस्ता.
- नेहरू गार्डनपासून शिवाजी रोड ते गाडगे महाराज पुतळ्यापर्यंतचा रस्ता.
- मेनरोड व बादशाही कॉर्नर भद्रकालीकडे जाणारा रस्ता.
- गाडगे महाराज पुतळा धुमाळ पॉइंट ते दहीपूलचा रस्ता.
- सीबीएस शालिमार व नेहरू उद्यानासमोरील सावानाकडे जाणारा रस्ता
- मेहेर सिग्नल ते शालीमारकडे नेहरू उद्यानामार्गे येणारा रस्ता.
रेडक्रॉस सिग्नल ते धुमाळ पॉइंट रस्ता - अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा-मालेगाव स्टॅण्डपर्यंतचा रस्ता.
- रविवार कारंजाकडून रेडक्रॉस सिग्नल चौकाकडे येणारा रस्ता.
