शनिवारी नाशिकचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ नाशिक:स्मार्ट सिटी अभियानांतर्गत फ्लोमिटर बसवणे तसेच जलवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी नाशिक शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भात नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे.

या नियोजित ‘शटडाऊन’मध्ये नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, पंचवटी, सातपूर आणि सिडको (नवीन नाशिक) या सर्व विभागांतील मुख्य जलवाहिन्यांवरील गळती काढणे, नवीन व्हॉल्व्ह बसवणे तसेच क्रॉस कनेक्शनची दुरुस्ती केली जाणार आहे. द्वारका, गांधीनगर, मुक्तीधाम, सातपूरमधील अंबड लिंक रोड, नाईकवाडी आदी प्रमुख भागांत ही कामे होणार आहेत.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक :

  • शनिवार, २० डिसेंबर : दिवसभर पाणीपुरवठा पूर्णतः बंद
  • रविवार, २१ डिसेंबर : सकाळी पाणीपुरवठा सुरू होईल; मात्र कमी दाबाने होण्याची शक्यता

महानगरपालिकेने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आधीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच शहराच्या पाणीव्यवस्थेच्या सुधारण्यासाठी सुरू असलेल्या या कामात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!