प्रभागप्रभाग २८ मध्ये प्रचाराचा जोर; भाजप उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक (प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक २८ मध्ये निवडणूक प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. उधाण आलेल्या प्रचारात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी बाईक रॅली काढत मतदारांना मतांचा जोगवा घालण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. घोषणाबाजी, रॅली आणि दिखाऊ प्रचाराच्या माध्यमातून शिट्टी वाजवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा कौल वेगळ्याच दिशेने झुकताना दिसत आहे.
या प्रचारदरम्यान प्रभागातील नागरिकांचा स्पष्ट व उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार फडोळ शरद हरिभाऊ, डॉ. वैभव अंकुश महाले, सीमा मकरंद वाघ व प्रतीमा बाळासाहेब पवार यांना मिळत असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे. विकासकामांचा विश्वास, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दिखाऊ प्रचाराच्या पलीकडे जाऊन कामावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे चित्र सध्या प्रभाग २८ मध्ये दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!