बाहेरचे पार्सल येणारे थांबवा, आणि स्थानिकांना न्याय द्या: गोपाळ लहांगे

घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून महाराष्ट्राची तहान भगवणारा तालुका आहे. मात्र हा तालुका व येथील आदिवासी बांधव व सर्व तालुका हा विकासापासून वंचित आहे. येथे येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदार फक्त त्याचा स्वताचा विकास करून सक्षम झाला आहे. स्थानिक मात्र विकासापासून वंचीत आहे त्यामुळे सर्व जनतेने आता स्थानिक माणसाला संधी देण्यासाठी तालुका एकत्रित झाला असून आता स्थानिक विरुद्ध उपरा अशी निवडणुक आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळणार असल्याचा घणाघाती टोला माजी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असला तरी येथील आदिवासी बांधव हा विकासापासून कोसो दूर आहे. मात्र येथे येणारा आमदार फक्त स्वतःचा विकास करत असुन तालुका मात्र भकास ठेवला आहे. यावेळी गोपाळ लहांगे यांनी इगतपुरी पंचायत समितीत सभापती पदी काम करताना अधिकारी वर्गाला धारेवर धरण्याचे काम केले होते. तालुक्यात विकासकामे होण्यासाठी मी अधिकाऱ्यांशी वैर पतकरले होते. त्यावेळी अधिकारी वर्गाने माझ्या विरोधात अनेक आंदोलने केली मात्र मी खंबीर पणे त्यांना सामोरे जाऊन तालुक्याच्या विकासासाठी झटत राहिलो आणि यापुढे ही तालुक्याच्या हितासाठी झडत राहील. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला सर्व विविध योजनेचा लाभ दिला आहे. त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात विधानसभेची उमेदवारी आज पत्रकार परिषदे मधून जाहीर करतो.

लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक येत्या दोन तीन महिन्यात होत आहे. या पाश्वभुमीवर इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथील काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी खंबाळे येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असुन इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातुन उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे.
तालुक्यात अनेक कंपन्या आहेत मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक भुमीपुत्रांना डावलून परप्रांतीयांना नोकरी दिली जात आहे. याबाबत आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधीच याची दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे स्थानिक भुमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तालुक्याचा विकास खुंटला असुन तालुक्यात अनेक समस्या सुटलेल्या दिसत नाही. मी पंचायत समिती सभापती असतांना अनेक विकासाची कामे केलेली आहेत. माझ्या कार्यकाळात मी प्रत्येक घटकाला न्याय देऊन कामे केलेली आहेत. सध्या तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेली जलजीवन मिशन योजनेचा पुर्ता बोजवारा उडालेला आहे. मात्र या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी मुग गिळुन गप्प आहेत. मला माझ्या समाजाचा व विविध संघटनांचा निवडणुकीसाठी पुर्ण पाठिंबा असल्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी मी उमेदवारी करणार असल्याने आपल्या चांगल्या कामामुळे व सर्वांच्या सहकार्यामुळे मी सन २०२४ च्या निवडणुकीत माझा निश्चित विजयी होईल असा विश्वास गोपाळ लहांगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला मिलींद जगताप, गौतम पगारे, रामदास पगारे, कैलास शिद, सुनिल पगारे, हिरामण कौटे, कैलास घारे, जीवन अस्वले, मुकुंद वारघडे, कोंडाजी लहांगे, बाजीराव लहांगे, कचरू लहांगे, राजेश घुटे, मनोज लहांगे, भाऊसाहेब डहाळे, निवृत्ती आवारी, उत्तम पारधी, रोहिदास घारे, भास्कर धोंगडे, गणेश लहामटे आदी उपस्थित होते.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या वीस वर्षात कुठंल्याच प्रकरचा विकास झालेला नाही तालुक्यात हजरो हेक्टर विविध प्रकल्पासाठी बाधित झालेली आहे मोठ्या प्रमनात धरणे रेल्वे औद्योगिक वसाहत असून सुद्धा येथील तरुण बेरोजगार आहे त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीची गरज या तालुक्याला आहे. म्हणून आज सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी आज बैठक घेत इगतपुरी चे वाडीवऱ्हे येथील माजी सभापती गोपाळ लहांगे यांना विधानसभेत संधी देऊन स्थानिकांना नेत्याला जनतेने निवडून. द्यावे आणि नगर, नंदुरबार व नाशिक येथील पार्सल यांना थांबावा असे पत्रकार परिषदेत सर्व पदाधिकारी यांनी सांगितलं तसेच विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातुन काही स्वयंघोषित लोक आपल्या तालुक्यात येऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे त्यांनी मतदार संघात उमेदवारी करून पाच हजार तरी मते घेऊन दाखवावी

गोपाळ लहांगे, माजी सभापती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!