ताहाराबाद मोसम नदीवरील पुल १० ऑगस्टला होणार खुला!

तुषार रौंदळ, सटाणा (प्रतिनिधी): ताहाराबाद येथील राष्ट्रीय राज्य महामार्गावरील मोसम पुलावरील बंद असलेल्या वाहतूक संदर्भात सटाणा तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत १० ऑगस्ट पर्यंत सदरील पुलावरील वाहतुक सुरळीत करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता बानखेडे यांनी स्पष्ट केले. ताहाराबाद येथील मौसम नदीवर पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने असल्याने माजी आमदार संजय बव्हाण, माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता यांना जाब विचारण्यासाठी सटाणा तहसिलदार यांच्या दालनात आज सोमवार संबंधीत विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्य निलेश कांकरिया, युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य मिलिंद चित्ते, कैलास मोरे, गजानन साळवे यांचेसह पदाधिकारी व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी बागलाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

मोसम पुलावरील वाहतुक बंद असल्यामुळे या परिसरातील ग्रामीण गावामधील नागरिकांना, वाहतुकीस अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन शालेय विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेथ नंदुरबार, साक्री, नवापूर, सुरत कडे जाणाऱ्या येणाऱ्या एस.टी. बस यांना मोठा आर्थिक भुरदंड सोसावा लागत असुन तसेच सर्वसामान्य नागरीकांना प्रवास करणे अवघड झाले आहे.

यावेळी माजी आमदार चव्हाण यांनी पर्यायी रस्त्यांची बिकट परिस्थिती झाली असुन ती दुरूस्ती करावी. तसेच या भागातुन अवजड बाहानांना बंदी करावी असेही सुचना करण्यात आली, तहसिलदार कैलास चावडे यांनी संबंधीत विभागाचे अधिकारी, ठेकेदार वानखेडे यांना काम कधी व कसे पुर्ण होणार याबाबत विचारणा केली व नागरिकांचा अंत पाहु नका असे स्पष्ट केले असता ठेकेदार वानखेडे यांनी १० ऑगस्ट पर्यंत सादील पुल खुला करण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीस परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!