बंद पडलेल्या कंपनीत थेट पोकलॅन, गॅस कटर व हायवा घेऊन भंगार विक्रीचा प्रकार

चार दिवसांपासून सुरू होता हा प्रकारामुळ मालकांना कळताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

सातपूर (प्रतिनिधी): अंबड एमआयडीसीत एका कंपनी मालकाची भंगार व्यवसायातून कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोच भरदिवसा बंद पडलेली कंपनीची तोडफोड करत लुट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरु होता.
कंपनी मालकाच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. बंद पडलेल्या कंपनीवर चोरांनी वक्रदृष्टी टाकल्याने उद्योजक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड एमआयडीसीत १९९१ मध्ये जे-४० प्लॉटवर राजेसाहब जकानी व देवराम आंधळे यांनी भागीदारीमध्ये जे. एन. इंडस्ट्रिज नावाने कारखाना सुरु केला. कालांतराने दोघा भागीदारांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची मुले कंपनी सांभाळत होते. २०१८ मध्ये कंपनी बंद पडली असून कुलूप आहे.
दरम्यान, रविवारी मयत भागीदारचे चिरंजीव अनुक्रमे अंजुम जकानी व संतोष आंधळे यांना सदरील कंपनी तोडत असल्याचे समजले. आंधळे व जकानी यांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी भरदिवसा पोकलॅन व गॅस कटरच्या साह्याने कंपनीची तोडफोड करत तेथील भंगार वाहनात टाकण्याचा प्रकार दिसून आला.
दरम्यान, आंधळे व जकानी यांनी चुंचाळे पोलिसांना घटनेची माहिती दिली. चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करंडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनेची खातर जमा केल्यानंतर संशयित रिंकल सिंग उर्फ रिंकू सिंग, उमलेश सिंग, संतोष जगताप व माधव इंगळे हे संगनमताने कंपनी लुटण्याचा प्रकार करत असल्याचे समोर आले. पैकी संतोष जगताप व माधव इंगळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून सिंग फरार झाले आहे. घटनास्थळावरून पोकलॅन, गॅस कटर व हायवा जप्त करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!