नाशिक (प्रतिनिधी): रेशनकार्ड धारकांची समस्या बिकट झाली असून कामानिमित्त सेतूकार्यालयालयात चक्रा मारून दमछाक होते. त्यात कर्मचा-यांची जास्त पौशांची मागणी. रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना सुरगाणा येथील सेतू कर्मच-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सिताराम बनश्या पवार (वय ३५, रा. रानविहिर, पो. सतखांब, ता. सुरगाणा) असे लाच घेणा-या संशयिताचे नाव आहे. तक्रारदाराने रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी प्रकरण दिले होेते. त्या बदल्यात संशयिताने २ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने संशयितास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशीरापर्यंत सुरू होते. पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related Posts
२४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत २९ म्हशींची सुखरूप सुटका!
सटाणा (प्रतिनिधी): सटाणा-मालेगाव रस्त्यावरील ब्राह्मणगावजवळ एका कंटेनरमधून म्हशींची वाहतूक होत असल्याचा संशय ग्रामस्थांना आल्याने त्यांनी तो कंटेनर अडवला असता, त्यात…
ई-बस डेपोसह चार्जिंग स्टेशनच्या कामाचे घोडे अडले!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आपल्या मागण्यांसाठी आडगाव ट्रक टर्मिनस येथील ई-बस डेपोसह चार्जिंग स्टेशनचे काम बंद पाडल्याने संबंधित…
निधीचा विचार न करता आमदारांनी केली स्वखर्चातून कालव्याच्या दुरूस्तीला सुरूवात!
सटाणा (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणावर हरणबारी उजवा कालवा असून त्या माध्यमातून पावसाळ्यात धरणाचे पूर पाणी व उर्वरित वेळी सिंचन…

