तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): बागलाण पश्चिम आदिवासी पट्ट्यातील साल्हेर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे या भर पावसामध्ये रविवारी मध्यरात्री पायरपाडा शिवारात शिकारीच्या शोधात आलेल्या दीड वर्षाचं बिबट्याच पिल्लू विहिरीमध्ये पडून विहिरीच्या काठावर बसून डरकाळी फोडत होता.
पायरपाडा ता बागलाण येथील शेतकरी गोविंद देशमुख यांच्या आराम नदीच्या काठावरील शेतामध्ये विहिरीमध्ये सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गणेश भोये हा तरुण पाणीच्या पिण्यासाठी हंडा भरण्यासाठी विहिरीवर गेला असता जेव्हा तो विहिरी जवळ गेला तेव्हा बिबट्याची डरकाळी चा आवाज आल्याने त्याची तारांबळ उडाली व त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून विहिरीमध्ये काहीतरी आहे तेव्हा ग्रामस्थांनी विहिरीमध्ये बिबट्या पडल्याच बघितल्याने त्यांनी सरपंच राणी भोये यांना माहिती दिली तेव्हा मधुकर भोये यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला विहिरी जवळ कोणी जाऊ नये म्हणून मधुकर भोये भास्कर बच्छाव हिरामण भोये साहेबराव ठाकरे गोटू जगताप यांनी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी येत नाही तोपर्यंत ग्रामस्थांना विहिरीजवळ जाऊ देत नव्हते. सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास ताराबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस व्ही सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली साल्हेरचे वन विभागाचे वनपाल विनायक देवरे वनरक्षक संदीप गायकवाड महेंद्र भदाणे माणिक मोरे आकाश कोळी निलेश कोळी न्यानेश्वर सोनवणे कुंदन देवरे राजाराम सूर्यवंशी धीरज बाविस्कर गणेश सूर्यवंशी सुरेश बहीरम सुरेश पवार मधुकर महाले जीभाऊ महाले किरण कांबळे लहानु चौरे स्वप्नील बहिरम कैलास गवळी निलेश सूर्यवंशी सतीश बहिरम आधी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होऊन बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करावे लागले सर्वप्रथम लाकडाच्या सहाय्याने शिडी तयार करून ती विहिरीमध्ये टाकण्यात आली मात्र पाऊस सुरू असल्यामुळे बिबट्या हा पाऊस थंडीमुळे पूर्ण मंदावलेला असल्याने सीडीवर येण्यास प्रतिसाद देत नव्हता त्यानंतर वन विभागाने विहिरीमध्ये जाळी टाकली तेव्हा बिबट्याने विहिरीच्या काठावरील कपाऱ्यामध्ये घुसून गेला तेव्हा नेमका कसा काय बाहेर काढायचा हाच मोठा प्रश्न वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी सह ग्रामस्थांना पडला होता बिबट्याचे पाय कपाऱ्या मधून बाहेर दिसत असल्यामुळे तेव्हा विहिरीवरून दोराचा फास तयार करून तो खाली टाकला तो दोराचा फास बिबट्याच्या पायामध्ये अटकवला व अल्हाद टाईट करून बिबट्या जाळीवरती टाकून जाळी गुंडाळून बिबट्या जरबंद केला व विहिरी मधून बाहेर काढण्यास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले त्यानंतर सदर बिबट्या जरबंद करून वन विभागाच्या शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले त्यानंतर त्याला जाळीमधून सोडून पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आले व त्याला चिकन देण्यात आले पाच ते सहा तासांच्या नंतर साल्हेर पासून तीन किलोमीटर अंतरावर कापशी बारीच्या जंगलामध्ये सोडण्यात आले.
पायरपाडा येथील बिबट्या हा एका वर्षाचा असल्याचा अंदाज आहे सदर त्याची आईचाही वावर या भागामध्ये असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थ देत आहे तरी रात्री वेळी रात्री या भागामध्ये शेतकऱ्यांनी कोणीही जाऊ नये रात्रीच्या वेळेस शेतामध्ये जाताना हातामध्ये काठी बॅटरी शिट्टी सोबत घेऊन जावे बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा.
-विनायक देवरे, वनपाल साल्हेरसाल्हेर पायरपाडा येथे शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याची विहीरीमधून सुखरूप बाहेर काढण्यात आला पाऊस सुरू असल्यामुळे सदर बिबट्या हा संपूर्ण थंडीने कडकडून गेला त्याला विश्रांती देऊन त्याला लागणारा खुराक देऊन संध्याकाळी त्याला जंगलामध्ये सोडण्यात आले
-संदीप गायकवाड, वनरक्षक वनविभाग साल्हेर
