अखेर अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीत स्पर्धा वाढली

नाशिक (प्रतिनिधी): अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सु्नल्ल झाली तरी अद्याप शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. तिस-या फेरीतही शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञानचा ९१ टक्के, तर वाणिज्यसाठी ९४ टक्क्यांवर गेला आहे. इंजिनिअरिंग, तसेच इतर क्षेत्रात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा वाढल्याने तिस-या फेरीतही विज्ञान व वाणिज्यची गुणवत्ता यादी अजुनही नव्वदीपार आहे. तिस-या फेरीत एकूण ३६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील महानगरांमध्ये केंद्रीय पद्धतीने आनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या ५ जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेतील अकरावी प्रवेशाचा महत्त्वाचा टप्पा दि. २७ जूनपासून सुरू झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी लागणा-या तिस-या फेरीची कट ऑफ लिस्ट अर्थात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विज्ञानसाठी आरवायके महाविद्यालयाची यादी ४५३ गुणांवर अर्थात ९०.६० टक्क्यांवर, तर केटीएचएमची गुणवत्ता यादी ४५२ म्हणजे ९०.४० टक्क्यांवर क्लोज झाली आहे. वाणिज्यमध्ये बीवायके महाविद्यालय ४७३ अर्थात ९४.६० गुणांवर क्लोज झाली आहे.  केटीएचएमची वाणिज्यसाठी गुणवत्ता यादी ८५.८० टक्क्यांवर क्लोज झाली आहे. तिस-या फेरीत फेरीत अ‍ॅलॉट केलेल्या ३६४४ विद्यार्थ्यांनी दि. २४ जुलैपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत.
नाशिक महानगरमधील ६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश सुरू आहेत. या प्रक्रियेची तिसरी फेरी सुरू असून, ती दि. २४ जुलैपर्यंत चालणार आहे. सोमवारी (दि. २२) अकरावी प्रवेशाच्या तिस-या फेरीची कला, विज्ञान व वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी महाविद्यालयनिहाय मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. तिसºया फेरीअखेर नाशिक शहरात अजूनही १५ हजार १७४ जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत १० हजार ८३१, दुस-या फेरीत ४८९५, तर तिस-या फेरीत ३६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९६६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यांत कॅपअंतर्गत ८६०३, कोट्यापैकी इन हाउससाठी ६२१, अल्पसंख्यांक गटात ३६४, तर व्यवस्थापन कोटांतर्गत ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!