स्वामी विवेकानंद विद्यालयात “शिक्षक दिन” साजरा

सटाणा (प्रतिनिधी): येथील सुबोध बहुउद्देशीय संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.शाळेचे संस्थापक अध्यक्ष किरण दशमुखे यांनी लिहिलेल्या ‘साने गुरुजी ‘ यांच्या जीवनावरील स्वाती उपाध्ये यांनी इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.वैशाली प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक किरण दशमुखे यांनी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन विविध वर्गांवर अध्यापनाचे काम केले. शाळेचे दिवसभराचे कामकाज विद्यार्थी शिक्षकांनी अतिशय चोखपणे पार पाडले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचे अनुभव कथन घेण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी अतिशय आनंदाने एक वेगळी अनुभूती घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी भोसले, मनीषा साबळे रिना जाधव, नूतन गंगेले, प्रतिभा दशमुखे, धनश्री सोनवणे, हर्षल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!