खटका उडालाच; लाडक्या बहिणीवरून श्रेयवादात अडकले मंत्रिमंडळ!

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अन अजितदादांच्या मंत्र्यांत खडाजंगी!

नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्यांचे नाव काढून त्या ठिकाणी अजित पवार आपले नाव कसे लावू शकतात. अजितदादांचा वादा आणि जाहिरातींवर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भूसे हे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक झाले होते. शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मंत्र्यांच्या वादात अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.

आगामी काळात कोणीही एकटा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटाचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आक्रमक झाले होते. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!