अंबड परिसरात शंभरहून अधिक तर सातपूर मध्ये ७८ मंडळानी केली श्रींची स्थापना!

अंकुश निकम,
अंबड (प्रतिनिधी): परिसरात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिडकोत यंदाच्या वर्षी शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकी येथून मंडळांनी परवानगी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळपासूनच घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात येत होती. सार्वजनिक मंडळाकडून ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणूकी पार पडल्या. ठिकठिकाणी भाविकांनी गणरायाचे पूजन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच लाडक्या गणरायाचे ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन करत सातपूरला देखील ७८ सार्वजनिक मंडळानी श्रींची स्थापना केली असून यात तीन मौल्यवान मंडळाचा समावेश आहे. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी अन् दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मिरवणूकीने सार्वजनिक मंडळ व घरगुती गणरायाचे स्वागत करण्यात आले. सातपूर सातपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी मंडळानी परवानगी घेतली आहे. सातपूर व्यापारी मित्र मंडळ, रजत नवशा गणेशोत्सव, बजरंग मित्र मंडळाचा मौल्यवान मंडळामध्ये समावेश आहे.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!