विकास शेंडगे,
घोटी (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यात स्थानिक विरुद्ध परके अशी लढाई सुरु असताना इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या कल्पना बोंबले यांनी इंट्री केली असून बोंबले घराणे स्वातंत्र्य काळापासून इगतपुरी च्या विकासासाठी लढत आहे पुंजाबाबा गोवर्धने यांच्या सोबत भात लढ्यात बोंबले कुटुंबियांनी काम केले होते राजकीय वारसा असलेल्या या कुटुंबाला विधानसभेसाठी कल्पना बोंबले या त्याच्या सुनबाई असून आगामी विधानसभेत त्या रिंगणात असणार आहे गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा निस्टता पराभाव झाला होता.
कल्पना बोंबले यांचे माहेर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथे आहे तर सासर इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील आहे त्यामुळे त्या स्थानिक असून त्यांना दोन्ही तालुक्यातून मदत होणार असल्याचे येथील मतदार संघातील नागरिक सांगत आहे. कल्पना बोंबले हे सक्षम हुशार व्यक्तिमत्व असून मतदार संघाच्या विकासासाठी त्या सक्षम असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करणार आहे. विशेष म्हणजे कल्पना बोंबले यांना राजकीय वारसा असून त्यांच्याकडे नियोजन कौशल्य असून त्यांना उमेदवारी मिळाली तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघावर नक्कीच राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल.
साधला असता त्यांनी देखील इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सिंचन, रोजगार, रस्ते दुरुवस्था, पिण्याचे असे अनेक प्रश्न दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथल्या जनतेने मला संधी दिली तर मी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाच्या सर्व समस्या नक्की मार्गी लावेल तसेच कल्पना बोंबले या सुशिक्षित असून विकासाच्या मुद्यावर त्या यशस्वी उमेदवार राहतील. तसेच त्यांचे सासरे रामभाऊ बोंबले हे मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव या ग्रामपंचायतचे अनेक वर्ष सरपंच देखील राहून गेले आहे.
