नागरिकांनी वालदेवी धरणावर गणेश विसर्जनासाठी न जाण्याचे आवाहन
प्रभाकर आवारी,
मुकणे (प्रतिनिधी): मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या असल्याने या दिवशी वाडीवऱ्हे परिसरातील पिंपळद हद्दीत वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास नागरिकांनी/ ग्रामपंचायत यांनी हरकत घेतल्याने या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यास पिंपळ ग्रामपंचायतने बंदी घातली आहे. यावेळी ग्रामस्थांनी बैठक घेवून गणेश विसर्जनाच्या दिवशी यापूर्वी अनेकदा दुर्दैवी दुर्घटना घडल्या असून अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी या धरणावर गणेश विसर्जन करण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या बैठकीस वाडीव-हे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे पोलीस उपनिरीक्षक श्री कचरे,पोलीस नाईक प्रवीण काकड, पोलीस पाटील बेझेकर, पिंपळद ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरवर्षी वालदेवी धरणावर गणेश विसर्जनासाठी नाशिक शहरातून,पाथर्डी फाटा, सिडको या भागातून तसेच वाडीवऱ्हे, पिंपळद विल्होळी या भागातील नागरीक गर्दी करत असतात गेल्या दोन ते तीन वर्षापासून वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
तरी गणेश भक्तांनी वालदेवी धरणावर गणेश विसर्जनास जाऊ नये व गर्दी करू नये असे आवाहन वाडीवऱ्हे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये व स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य करू नये. असे आवाहनही वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले आहे..
