खुटवडनगरचा रस्ता बनवणार काँक्रीटचा!

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेने २० कोटी रुपये खर्च करून तयार केला जाणारा कामठवाडे परिसरातील ५० हजार नागरिकांच्या सोयीचा खूटवडनगर भागातील माउली लॉन्स ते आयटीआय पुलापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यासाठी शंभर टक्के निधी हा राज्य शासनाचा असणार आहे.

गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच आमदार विरुद्ध नगरसेवक या संघर्षामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात केली आहे. मनपा क्षेत्रातील आमदारांना नगरविकास खात्यामार्फत निधी दिला जातो. ग्रामीण भागातील आमदारांना ग्राम विकास खात्यामार्फत निधी दिला जातो. शहरी भागात नगर विकास खात्याने निधी दिल्यानंतर मनपा यंत्रणेच्या माध्यमातून कामे होणे अपेक्षित असते. मात्र, मनपा व जि.प. स्तरावर काम आल्यानंतर टक्केवारीच्या राजकारणामध्ये वाटेकरी असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे वर्ग करण्याकडे आमदारांचा कल दिसून आला आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!