गणपती विसर्जनाला गालबोट: दोन युवक पाथर्डीला पाण्यामध्ये बुडाले!

नाशिक (प्रतिनिधी): गणपती विसर्जनाच्या सायंकाळी साडेसहा वाजता पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता भागातील वालदेवी नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पाथर्डी फाटा भागातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी ओंकार गाडे (वय23) आणि स्वयम मोरे (वय 24) या दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे दोघे मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात हे दोघे पडले.

ओंकार हा केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर स्वयम संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्वयमचे वडील माजी सैनिक असून त्याला एक बहीण आहे. तर ओंकारचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. एका तासानंतर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!