लोकवर्गणीतून उजळली ज्ञानज्योती!

सीईओ ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून सोमपूरमध्ये ‘सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका सुरू

तुषार रौंदळ ,
सटाणा (प्रतिनिधी): 
सोमपूर (ता. बागलाण) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील वाटचालीस बळकटी मिळावी, या उद्देशाने सोमपूर गावात ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिका उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही अभ्यासिका शासकीय निधीऐवजी गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून उभी राहिली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून आणि गावचे भूमिपुत्र श्री. महेश पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद नाशिक) यांच्या प्रेरणेतून हा अभिनव उपक्रम साकारला आहे.

दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून सीईओ श्री. पवार यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गावातील सर्वच घटकांच्या एकत्रित सहभागातून समाजोपयोगी कार्य कसे साध्य करता येते याचे हे उत्तम उदाहरण ठरल्याचे श्री. पवार यांनी गौरवोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!