सटाणा (प्रतिनिधी): खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ढोलबारे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे पँथर क्रांतिवीर जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या युनिटची स्थापना करण्यात आली. मार्केटच्या परिसरात कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युनिटच्या शाखेचे अनावरण केले. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, तथा राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष करण (भाऊ) गायकर आणि पँथर क्रांतिवीर जनरल कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय (अण्णा) वाहूळे, सरचिटणीस कुलदीप पवार यांच्या हस्ते तसेच राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (नाना) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे अनावरण करण्यात आले. या युनिटच्या अध्यक्षपदी जालिंदर भामरे, उपाध्यक्षपदी अतुल मोरे, सरचिटणीस प्रविण मराठे, खजिनदारपदी किरण अहिरे तर सदस्य म्हणून तुषार घरटे, आकाश चव्हाण, प्रविण पवार, ललित जगताप, तेजस गांगुर्डे, अविनाश अहिरे आदींची नेमणूक करण्यात आली.
माथाडी कामगारांच्या न्याय्यहक्कासाठी युनियनची स्थापना करणे अत्यंत आवश्यक असते, कामागारांची एकजूट हीच त्यांची खरी ताकद आहे, या कामगारांच्या हीतासाठी मी व माझे संघटन सदैव पाठीशी उभे राहू अशा शब्दात उद्घाटक करण गायकर यांनी कामगारांचे मनोबल वाढविले, पँथर क्रांतिवीर जनरल कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय वाहूळे म्हणाले की, माथाडी कामगारांची मोठी शक्ती आपण उभी केली आहे, यापुढे या मार्केट मधिल कामगारांकडे कोणीही वक्रदृष्टी केल्यास त्यांची गाठ पँथरशी असेल, कामगारांचे हीत हेच आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू. प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोगतात म्हणाले की, कामगारांनी आपल्या संघटणात्मक शक्तीचा वापर हा शेतकरी हीतासाठी करावा, प्रत्येक घटकाशी सौजन्याने वागावे आणि आपल्या हीतासोबतच समाजाच्या हीतालाही प्राधान्य द्यावे.
या युनिटच्या शाखा अनावरण प्रसंगी शेतकरी कार्य समितीचे सदस्य भिला ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे, सुभाष शिंदे, मयुर नेरकर, संगिता नांद्रे, चंद्रकला चौरे, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष नयन बच्छाव, सल्लागार संदीप साळवे, खजिनदार नितिन घरटे, पांडूरंग पवार, गोदावरी पवार, राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे महासचिव गणेश पवार, सुनिल पवार, नितिन पगारे, चेतना पगारे, ललित पाटील, निखिल पवार, हेमंत मानकर, भूषण निकम, भूषण मानकर आदींसह मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.
