राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने शेकडो महिला जाणार! 

  • राज्यस्तरीय पहिले एकदिवसीय अधिवेशन
  • कल्याणकारी संघटना महिला केडर व कर्मचारी व कर्मचारी महिला यांची बुलढाणा सिंदखेड राजा येथे उपस्थित राहणार

विकास शेंडगे,
घोटी (प्रतिनिधी): इगतपुरी तालुका उमेद च्या वतीने शेकडो महिला एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा जि. बुलढाणा या ठिकाणी रवाना झाल्या असून यामध्ये प्रामुख्याने ८४ लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास’ स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे व उमेद अभियानातील सर्व कॅडर यांना अशा सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तक यांच्या प्रमाणे गाव व प्रभाग स्तरावरील ग्रामविकास विभागाचे कॅडर म्हणून मान्यता देणे या मागण्यासाठी तालुक्यातून शेकडो महिला जिल्हा बुलढाणा सिंदखेड राजा येथे उपस्थित असणार असल्याची माहिती इगतपुरी तालुका उमेद च्या सचिव जया लंगडे यांनी दिली आहे. यावेळी सचिव जया लंगडे, आरती अडॊळे, दीपिका जाधव, आशा लंगडे, सुषमा कडू, नंदा गटकळ, अलका मदगे, शैला भागडे, निलम भागडे, सविता चंद्रमोरे, हौसा भगत, दिपाली जुगरे या महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!