जॉब हवा आहे का? आयटीआय ॲप्रेंटिससह अन्य पदांच्या २५३ जागा: २२ जून मुदत

नाशिक (प्रतिनिधी): हेवी व्हेइकल्स फॅक्टरीत (चेन्नई) आयटीआय ॲप्रेंटिससह अन्य पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यात एकूण २५३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत २२ जून आहे. यासाठी उमेदवार हे दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असावेत. यासाठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्ष आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ६००० ते ८०५० स्टायपेंड दरमाह मिळेल. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी avnl.co.in संकेतस्थळ पहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!