पिंपळगाव मोर येथे कारचा अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी

घोटी (प्रतिनिधी): चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली. या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.२९) नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील पिंपळगाव मोर गावाजवळ असलेल्या दारणा नदीच्या पुलावर हा अपघात घडला.

नागपूर-मुंबई महामार्गवरील पिंपळगाव मोर गावाजवळून जात असताना बुधवारी दुपारी चालकाचे कार वरील (एमएच०५ बीएस५१६४) नियंत्रण सुटले. यामुळे कार दारणा नदीवरील पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात काचालकाचा मृत्यू झाला असून दोन महिला आणि एक पुरुष असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे पोलीस कर्मचारी व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सागर सौदागर, गौरव सोनवणे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे धामणगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात केले. अपघातातील मृत कारचालक व जखमी व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. पुढील तपास घोटी पोलीस पथकाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!