गरुड झेप प्रतिष्ठान ने नोंदवला 18 वा जागतिक विक्रम!

2500 दिवस वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान राबवले

नाशिक (प्रतिनिधी): गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन, गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2500 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.

25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे. याचे 18 जागतिक विक्रम झाले आहेत . रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स , ब्राहो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .


आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2500 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – संगीता भानोसे , संकेत भानोसे, अविनाश क्षीरसागर, अजिंक्य तरटे, सागर बोडके, अंजली प्रधान ,रेणू भानोसे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत. सातत्यपूर्ण 2500 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी, सकारात्मक विचार,जिद्द, नियोजन,निर्णयक्षमता, सृजनशीलता आवश्यक आहेत.
गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे, संगीता भानोसे, रेणू भानोसे, प्रा अमोल अहिरे, अंजना प्रधान रॉयल रायडर्स नासिक रोड चे अध्यक्ष राजू रूपवते व हिरवा कुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलय बाबू शाह, नलिनीताई शाह ,राखी दिदि शाह व वेलीना दीदी इतर मित्र यांच्यासोबत अभियान यशस्वीरित्या राबविले. पुढील टार्गेट सातत्यपूर्ण 3 हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!