नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवात कृषिमंत्री माणिककराव कोकाटेंनी दिला कृषी व्यावसाईकांना दिलासा!

लक्ष्मण सोनवणे,

बेलगाव कुऱ्हे: किरकोळ विक्री साखळ्या आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक व दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे राज्याचे कृषिमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कृषिमंत्री अँड कोकाटे यांनी विविध स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. महोत्सवामध्ये कृषी विभागाचे स्वतंत्र दालन असून यात शासकीय विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचे शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल आहेत. या स्टॉल ला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून शेतकरी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहून माहिती घेत आहेत. यासोबतच जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांचे विविध उत्पादने असणारे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री साठी स्वतंत्र दालन उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने सेंद्रिय उत्पादने यात भात, वरई, नाचणी, पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ, मिलेट आईस्क्रीम, मोहाच्या फुलांपासून बनविलेले पदार्थ, वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष, मसाले अशा विविध उत्पादनाचा समावेश आहे.
महोत्सवामध्ये दररोज विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रम तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!