नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या नगररचना विभागामध्ये आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पुन्हा एकदा अभियंत्यांची खांदेपालट केली आहे. नगररचना विभागावरच आयुक्तांनी फोकस केल्याने या विभागाविषयी आता जोरदार चर्चा रंगली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये नगररचनातील उप अभियंता दत्तात्रय शिंगाडे यांची नाशिकरोड मलनि:सारण विभागात बदली करण्यात आली आहे. शिंगाडेंच्या जागी राजेश पालवे यांची नियुक्ती केली आहे. सहाय्यक अभियंता समीर रकटे यांची बांधकाम पश्चिम विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी शाखा अभियंता सुभाष बहिरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता संतोष जोपळे यांची पंचवटी उद्यान विभागात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सहाय्यक कनिष्ठ अभियंता वसंत ढुमसे यांची बदली केली आहे. नगररचना विभागातील सहाय्यक कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांची सातपूर पाणी पुरवठा विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर शाखा अभियंता रुपेंद्र कुमार चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. नगररचना विभाग व बांधकाम विभागात दोन्हीकडे कार्यरत असलेले कनिष्ठ लिपीक विशाल तांबोळी यांची सिडकोत विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर शिक्षण विभागाचे कनिष्ठ लिपीक राजू मोरे यांची नियुक्ती झाली आहे. शिपाई संवर्गातील कैलास गायधनी याची बदली जाहिरात परवाने विभागात तर नीलेश नवले, रमेश सोपे, विजय सावंत, संगीता शेवाळे, गोकुळ काजळे, अभिषेक पोटींदे, मोनाली मोरे, राजेंद्र आव्हाड व नारायण साळवी या शिपाई संवर्गातील कर्मचा-यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
