नाशिक (प्रतिनिधी): प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सोमवारी (दि.१७) विविध विभागातील अधिका-यांचा समावेश असणारे असन यात २०हून अधिक अधिका-यांचे पथक प्रयागराजकडे विमानाने रवाना झाले.
यामुळे नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ्यास नेतृत्व करण्यासाठी अधिका-यांना फायदा होऊ शकतो असा आयुक्तांना विश्वास असल्याचे दिसून येते. या मुळेच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांच्यासह शहर व ग्रामीण पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागांचे प्रमुख असे २०हून अधिक जणांचा पथकात समावेश आहे. मनपा आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता आणि अन्य असे एकूण सात तर, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील मुख्याधिका-यांसह पाणी पुरवठा विभाग व शहर अभियंता अशा तीन जणांचा समावेश आहे. मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत ते कुंभमेळ्यात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, पथक प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील व्यवस्थेचा अभ्यास करणार आहे.
