नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस व बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र सातपूरकर (६६) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी (दि. २०) दुपारी निधन झाले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स आणि नाशिक बॉडी बिल्डर्स असोसिएशनमध्ये राजेंद्र सातपूरकर यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सातत्याने शरीरशाैष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सातपूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना असा परिवार आहे. या निधनाने नाशिक व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनमध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे.
Related Posts
गंधारी व चांदशी शिवारात जाण्यासाठी नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत!
पाच वर्षांपासून पुलाचे व रस्त्यांचे कामे पुर्ण होईना! नाशिक (प्रतिनिधी): सुंदर नाशिक ही संकल्पना फक्त कागदोपत्रीच का? असा प्रश्न नागरिकांमध्ये…
मनपातील शंभरहून अधिक कर्मचारी होणार निवृत्त!
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील स्थायी पदांवरील जवळपास ११० अधिकारी व कर्मचारी पुढील २०२५-२६ या वर्षात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे…
एनडीसीसी बँक नोकरी घोटाळा: परवेज कोकणीसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एन डी सी सी) नोकरीचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई…
