पाच वर्षांपासून पुलाचे व रस्त्यांचे कामे पुर्ण होईना!
नाशिक (प्रतिनिधी): सुंदर नाशिक ही संकल्पना फक्त कागदोपत्रीच का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतांना दिसत आहे. नाशिक महानगरपालिकेकडून मंजुर झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ठेकेदारांच्या निकृष्ठ कामांमुळे व कामाच्या धिम्यागतीमुळे कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. गंधारी हे गाव मनपा हद्दीत आहे तसेच गंधारी व चांदशी शिवा रस्त्यात नाला मध्ये आहे. मनपा परिसरातील असलेले गांधारी व चांदशी शिवारात पुलाचे व रस्त्यांचे कामे गेले 4 ते 5 वर्षांपासून सुरू आहे. याठिकाणी मोठी रहिवासी इमारतींचे बांधकाम आहे व काहीठिकाणी सुरू आहे. गंधारी व चांदशी शिवारात जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने येथील रस्त्यांवर सर्व चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसते तसेच लहान मुलांचा शाळाप्रश्न असो की नागरिकांचा कामावर जाण्याचा मार्गा हा येथील एकच असल्याने येथील पुलाचे काम हे धिम्यागतीने चालु असल्याने नागरिकांना याठिकाणी मार्ग काढण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
येथील परिसर शहरापासून काहीअंतरावर असल्याने लहान मुलांना शाळा, क्लासेसाठी जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने पालकांसमोर मुलांना शाळेत सोडण्याचे व घेऊन येण्याचे मोठे चिंतेचे कारण् उभे आहे. येथील रहिवाशांकडून येथे कामसुरू असलेल्या ठेकेदारांना देखील हा प्रश्न उपस्थित करून जाब विचारण्यात आला मात्र उडवाउडवीचे उत्तरांसह आरेरावीची भाषा ठेकेदारांकडून करण्यात येत असल्याचे येथील नागरिकांनीकडून सांगण्यात येते. याठिकाणी नागरिकांना मार्गक्रमण करण्यासाठी येथील रस्त्याची कोणत्याही प्रकारे डागडुजी न करता नागरिकाना आपल्या परिवारांसह जिव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यामुळे मनपाच्या या कामांमुळे नागरिकांकडून तिव्र स्वरूपात संताप व्यक्त होत आहे. येथील पुलाचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण कधी होणार असे मनपाकडून जाहीर करण्यात यावे. अन्यथा नागरिकांकडून याठिकाणी तिव्र स्वरूपात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असे गौरव तालेवार, विनायक कारे, समीर जाधव, गणेश कदम, प्रशांत बेडकोळी, सरला नामणे, शरद गायकवाड, कुणाल मोरे, धीरज पवार व अॅड. नैना पवार, स्नेहा उफाडे, डॉ. शुभांगी वाघ, संगिता पवार, प्रा. माया वारूंगसे, पुनम आचार्य, अरूणा तपकीरे, आतुल कोरडे व त्रस्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहे.
येथे राहणारा 80% वर्ग हा मध्यमवर्गीय असून लहान मुलांना शाळेत जाणे असो वा कामावर जाणे असो येथील पुलाचा मार्ग हा एकच असून याठिकाणी सर्व चिखलाच्या रस्त्यांमुळे अनेकदा दुचाकी घसरतांना दिसतात व अपघात ही होत यासाठी सर्वस्वी जबदार हे मनपा अधिकारी व येथील ठेकदारांच आहे.
विनायक कारे, नागरिकयेथील रस्ता तर महिलांना चिखलातून दुचाकी चालविण्यासाठी जिवघेणा ठरत असून लहान मुलांना घेऊन दुचाकी चालविणे जिकरीचे झाले आहे. तरी मनपाने यावर मार्ग काढत लवकरात लवकर येथील पुलाचे काम पुर्ण करून डांबरी रस्ते करावे.
स्नेहा उफाडे, गृहिणी
