राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र आयोजित जिम्नॅस्टिक स्पर्धा उत्साहात संपन्न…
नाशिक (प्रतिनिधी): पालक हेच सर्वप्रथम मुलाचे प्रशिक्षक असून मुलांमध्ये असलेले विविध कलागुण, कौशल्य, त्याची आवड हे ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करियर करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळांमध्ये अनेक प्रकारच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. मात्र, त्याकडे करिअर म्हणून बघता आले पाहिजे. बऱ्याचदा खेळाडू अनेक वर्ष सराव करतात खेळ खेळतात त्यात प्राविण्य ही मिळवतात परंतु अचानक कुठे तरी अर्ध्यावर सोडून देत असतात. असे करता कामा नये, खेळाडूंसाठी शिक्षणात व नोकरीत विशेष सवलती, कोटा राखीव असतो. याविषयी पालक आणि विद्यार्थांनी जागरूक राहून त्याचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी खेळाडूवृतीच्या मुलांना अभ्यासोबतच खेळण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले पाहिजे तरच तुमची मुले जिल्हा, राज्य नंतर राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून स्वतःचे व देशाचे नाव मोठ करतील असे मत नाशिक मधील टेबल टेनिस खेळातील राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू व प्रशिक्षक श्री अजिंक्य शिंत्रे यांनी व्यक्त केले.
सालाबाद प्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधत राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र च्या वतीने दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय केंद्रातील सदस्य अंतर्गत जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण सोहळा शिवजयंतीच्या दिवशी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
या वेळी राज्य स्तरावर पदक प्राप्त खेळाडू चिरंजीवी देसले याने प्रात्यक्षिके सादर केली. तर योगा प्रशिक्षक व खेळाडू समृद्धी गोरे हिने आसन व योगाने सर्वांचे डोळे टिपले. संस्थेचे जिम्नॅस्टिक हेड कोच अनिकेत देशमुख व चंद्रशेखर सोनवणे (उपाध्यक्ष NDGA) यांच्या प्रयत्न तुन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सहायक प्रशिक्षक राहुल चौधरी व समृद्धी गोरे हे विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी नियमित प्रशिक्षण देत असून विद्यार्थ्यांना स्पर्धेस तयार करत मार्गदर्शन आहे.
कै. मेजर सुधाकर पिसोळकर यांनी राजे शिवाजी मार्गदर्शन केंद्र ची स्थापना केली त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता लावलेले हे छोटेसे रोपटे आज मोठ्या वटवृक्षाचे स्वरूप प्राप्त झाले असून या केंद्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणारे विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. योगासने, टेबल टेनिस, उंची वाढ, जिम्नॅस्टिक खेळ तसेच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाकरिता सर्व प्रकारचे वर्ग, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. याकरिता मुख्य प्रशिक्षक अनिकेत देशमुख, चंद्रशेखर सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहेत. सीए प्रवीण कुलकर्णी यांच्या सौजन्याने या ठिकाणी नवीन एक टेबल टेनिस कोर्ट तयार करण्यात आले आहे त्याचे संस्थेच्या प्रती असलेले योगदान हे फार मोठे असून त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या देणगी प्राप्त होत असतात. भविष्यात अनेक विद्यार्थी व खेळाडू घडवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होईल व त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
– श्री. विनायक येवले (अध्यक्ष)
कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्य प्रशिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा. भास्कर कवीश्वर यांनी केले तर व आभार प्रदर्शन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या आयोजन करण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी विनायक येवले, भास्कर कवीश्वर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सीए प्रवीण कुलकर्णी, सीए भालचंद्र कर्वे, योगेश कातकाडे, प्रशांत कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.
