आयुक्तांनी सिडकोतील पाणीप्रश्नी दिला अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा!

नाशिक (प्रतिनीधी): गुरुत्ववाहिनीवरून नियमबाह्य होणारा पाणीपुरवठा तत्काळ बंद करून जलकुंभावरूनच पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आयुक्तांनी देत व्हॉल्व्हमनच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी वरिष्ठांना दिले. दरम्यान, पाणीपुरवठ्यात बदल न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. सिडकोतील कृत्रिम पाणी टंचाईला व्हॉल्व्हमनसह काही अधिकारी जबाबदार असून, जलकुंभातून नियमबाह्यरित्या होणारा पाणीपुरवठा, पाइपलाइनवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत नळजोडण्या अशा विविध बाबी जबाबदार असल्याची माहिती मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केलेल्या पाहणीतून समोर आली आहे.
आमदार सीमा हिरे यांनी आयुक्त खत्री यांची भेट घेत सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला होता. या तक्रारींनंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी शनिवारी (दि.१) पहाटे पाहणी दौरा केला. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, सिडको विभागाचे उपअभियंता एजाज काझी व नाशिक पूर्व विभागाचे उपअभियंता नवनीत भामरे आदी उपस्थित होते. सिडको विभागातील पवन नगर जलकुंभ, सावतानगर जलकुंभ, सावतानगर सम्पची पाहणी केली. सावतानगर सम्पवरील पंप हाऊसपासून पंपींगव्दारे होत असलेला पाणी पुरवठा जलकुंभाचे वितरण व्यवस्थेला जोडण्याचे आदेश देण्यात आले. जलकुंभ भरणाºया उर्ध्ववाहिनीवरुन थेट होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. राणेनगर फ्लॅट सिस्टीम बोगदा ते स्टेट बँक चौफुली येथील सिडकोने बांधलेल्या बहुमजली निवासी इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याने आयुक्तांनी त्या इमारतींची पाहणी केली. त्याठिकाणी पाइपलाइनवरच अतिक्रमण असल्याने दुसºया मजल्याकरीता स्वतंत्र पाणी पुरवठा करणाºया जलवाहीनींवरील अनधिकृत नळ जोडणीधारकांचा शोध घेणे शक्य होत नसल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. महादेव चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सिडकोने विकसीत केलेल्या योजनेवर विविध ठिकाणी पाणी पुरवठ्याची माहिती घेतली असता अनेक ठिकाणी एकाच नळ जोडणीवर एकापेक्षा जास्त कुटुंब अवलंबून असल्याचे तसेच पाणी मोजण्यासाठी वॉटर मीटर बसविण्यात आलेले नसल्याची बाब आढळून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!