लाचखोरांचे जळं संपेना: पुन्हा एक बीडीओ २ लाख १० हजारांची लाच स्वीकारतान बीडीओ एसीबीच्या जाळ्यात!

नाशिक (प्रतिनिधी): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत असलेले २ कोटी ३२ लाखांचे बील काढून देण्याच्या मोबदल्यात २ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना रंगहात पकडले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असलेल्या ठेकेदाराने गटविकास अधिकारी पोतदार यांच्याविरोध एसीबीच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गटविकास अधिकारी पोतदार यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये यांचे थकीत सुमारे २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांचे बील काढण्याच्या मोबदल्यात २ लाख १० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या आधारे एसीबीच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता संशयित पोतदार हे लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारत असताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांच्यासह किरण धुळे, विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!