सावधान गुन्हा दाखल: आर्थिक व्यवहारात ८० लाखांची फसवणुक केली!

नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक व्यवहारात परिचिताने एकाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने ४५ वर्षीय व्यक्तीने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल कादिर अहमद शेख (रा. वडाळागाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नासीर हमीद शेख (वय ४५, रा. सारडा सर्कल) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित अब्दुल शेख व फिर्यादी नासीर शेख एकमेकांचे परिचित असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत. संशयिताने २०१३ मध्ये नासीर शेख यांच्याकडून प्लॉट डेव्हलप करण्यासाठी ८० लाख रुपयांची रोकड हात उसनवार घेतली होती. त्यानंतर ही रक्कम परतही करण्यात आली. या व्यवहारादरम्यान केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही फसवणुक करण्यात आली. व्यावसायिक गाळे खरेदी -विक्री व्यवहारात पैसे घेतल्याचे भासवून संशयिताने बनावट कागदपत्राच्या आधारे नासीर शेख यांना पोलिसात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ८० लाख रुपयांची मागणी केली. अधिक तपास सहायक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!