…तर अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री करणारे ९० विक्रेत्यांना अटक!
- एवढे प्रवाशी विनातिकीट प्रवास करताच कसे? कोण देते यांना एवढी हिमंत… असा प्रश्न जनसामान्यांत व्यक्त होत आहे.
मनमाड (प्रतिनिधी): मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागात विनातिकीट प्रवास करणा-या २८६ प्रवाशावरकारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे २ लाख ८ हजार ६५५ रुपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये आणि स्थानकावर खाद्यपदार्थांवर जास्त शुल्क आकारताना ९ विक्रेते पकडण्यात आले असून रेल्वेत आणि स्थानकांवर अनधिकृतकीत्या खाद्यपदार्थांची विक्री करणा-या ९० विक्रे त्यांना अटक करण्यात आली आहे. तर ओळखपत्र, गणवेश, वैद्यकीय कार्ड आणि पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे नसल्याचे आढळून आलेल्या ६८ पँट्रीकार व ट्रेन साइड पँट्रीकारमध्ये काम करणा-या अधिकृत विक्रे त्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १३ एजन्सींकडून एकूण १५८६ बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात फुकटे प्रवाशी, धुम्रपान करणारे, अस्वच्छता करणारे आणि स्थानक आणि धावत्या रेल्वेत अवैद्यरित्या खाद्यपदार्थ व पेय विक्री करणा-यांविरोधात तीन दिवसीय मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत भुसावळ स्थानकावर ए. एच. व्हीलर्स कालबाह्य झालेल्या अमूल ब्रँडची बिस्किटे विकताना आढळल्याने वाणिज्य विभागाकडून विक्रेता संस्थेला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या तीन दिवसीय मोहिमेदरम्यान रेल्वे वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेत आणि स्थानकातील विना तिकीट प्रवास करणा-या २८६ प्रवाशांकडून २ लाख ८ हजार ६५५ रुपायांचा दंड वसूल केला. रेल्वे परीसरात धुम्रपान करणा-या १८ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ४ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अशाप्रकारे या तीन दिवसीय मोहिमेत एकूण १४७२ प्रकरणांतून ७ लाख ५४ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तर या मोहिमेमध्ये १५ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच रेल्वे परिसरात कचरा टाकणा-या एकूण ५१ जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण २३ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
